मुख्यमंत्र्यांबद्दल आदित्य ठाकरेंच्या
मुख्यमंत्र्यांबद्दल आदित्य ठाकरेंच्या "त्या" वक्तव्याचा खा. श्रीकांत शिंदेंनी घेतला खरपूस समाचार
img
दैनिक भ्रमर
आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. 

आरशामध्ये पाहिलं की, आपली लायकी आणि औकात काय हे कळेल, असा हल्ला बोल खा. श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला. आमच्यावर बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे आणि आमच्या आई-वडिलांचे चांगले संस्कार आहेत. पराभव जेव्हा समोर दिसतो, तेव्हा माणूस तडफडतो, असं वक्तव्य करतो. आपल्या लायकीप्रमाणे आपण बोललं पाहिजे, लायकी नसताना आपण ज्यांच्यावर बोलतो ते जनता बघत असते.

४ जूनला जनताच उत्तर देईल, तुमचं योगदान काय, तुमची पात्रता काय, तुमची लायकी काय? अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group