राज्यात महायुतीचे सरकार विधासभेत महायुतीने ऐतिहासिक विभाज्य मिळविला परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र दारुण पराभव सहन करावा लागला. दरम्यान आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले असुन राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आलं आहे. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंबाबत देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी केली आहे.
मुंबई भाजपकडून मुंबई रस्ता घोटाळाप्रकरणात एसआयटी चौकशी लावण्याची मागणी होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील रस्त्याच्या घोटाळ्याची चौकशी करा हेच मी बोलत होतो. जी मी मागणी करत होतो, तीच मागणी आता भाजप करत आहे. खोके सरकारच्या देखरेखीत मोठा घोटाळा झाला आहे. आता फडणवीसांचं सरकार आलं आहे, त्यांना आता स्वच्छ सरकार चालवण्याची खरोखर मोठी संधी आहे, त्यांना जर स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर त्यांनी चौकशी पूर्ण होईलपर्यंत एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की या सर्वामध्ये त्यांचा हात नाही, आणि ठेकेदाराचा फायदा झाला नाही. तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळापासून बाजुला ठेवावे तर आणि तरच आम्ही समजू की हे सरकार वाशिंग मशिन सरकार नाही.