२४ वर्षांनी नागपंचमीला दुर्लभ राजयोग, महादेवांचा आशीर्वाद लाभणार? जाणून घ्या आजचं राशीभविष्य
२४ वर्षांनी नागपंचमीला दुर्लभ राजयोग, महादेवांचा आशीर्वाद लाभणार? जाणून घ्या आजचं राशीभविष्य
img
Dipali Ghadwaje

आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे.  आजचा सोमवारचा दिवस कसा असणार आहे? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी चंद्र तूळ राशीत असणार आहे. अशा स्थितीत चंद्र आणि गुरु समोरासमोर असतील. त्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच पहाटे ४.२२ पासून सर्वार्थ सिद्धी योग व अमृत योगही जुळून आले आहेत. भगवान शंकरांचा आवडता वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमवारीच नागपंचमीचा दुर्लभ योगायोग जुळून आल्याने आजचा दिवसच दुग्धशर्करा योग म्हणता येईल. 
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार तब्बल २४ वर्षांनी अशाप्रकारे नागपंचमी व सोमवार हे समीकरण जुळून आले आहे. आज चित्रा नक्षत्र अधिक तेजस्वी आहे. 
 

मेष  
मेष राशीच्या मंडळींसाठी नागपंचमी हा दिवस अत्यंत खास असणार आहे. यादिवसापासून आपल्यावर भगवान शिव व नाग देवता या दोघांची कृपादृष्टी राहू शकते. व्यावसायिकांना प्रचंड मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर कौटुंबिक सुखाने आपणही भारावून जाऊ शकता. तुमचे समाजातील स्थान व मान- सन्मान वाढीस लागेल. पूजा व सार्वजनिक धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.


कर्क  
कर्क राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आरोग्यरूपी धनसंपदा आपल्या भाग्यात आहे. तुम्हाला उर्जावान वाटेल व मागील काही दिवसांपासून पसरलेली मरगळ गाळून पडेल. जोडीदाराकडून एखादी सुखाची बातमी मिळू शकते. तुम्हाला नव्या कामांची ऊर्जा जाणवू शकते.


सिंह 
सिंह राशीच्या मंडळींना आज धनलाभ होऊ शकतो आपली आर्थिक स्थिती अगदी कोट्यधीशांप्रमाणे होण्याचे सुद्धा योग आहेत. आपल्याला फक्त थोडं सावध राहण्याची गरज आहे. वाहन व प्रॉपर्टीच्या खरेदीचे योग आहेत. एखाद्या वादात तुम्हाला यश लाभण्याची चिन्हे आहेत पण काही प्रमाणात नाहक मनस्ताप होऊ शकतो.

धनु  
धनु राशीसाठी सुद्धा आजपासून पुढील संपूर्ण महिना हा लाभदायक असणार आहे, तुमचा कामाचा वेग व सहकाऱ्यांसह ताळमेळ दोन्हीमध्ये सुधारणा होऊ शकते. तुमच्या नवकल्पना लोकांना आवडतील यामुळे तुम्हाला मान व धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून  दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या
Join Whatsapp Group