आज 10 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार गुरूवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज प्रवासाचे योग येतील, मनाची थोडी अस्थिरता जाणवेल
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज आपल्या विचारांशी पक्के राहाल, खांद्याची आणि कानाची दुखणे डोके वर काढतील
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या विरुद्ध कोणी बोललेले तुम्हाला सहन होणार नाही, अशावेळी तुमचा हटवादीपणा बाजूला ठेवावा लागेल
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज महिला धीराने परिस्थितीला सामोरे जातील भरपूर काम कराल
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमच्यासारखा कामसूपणा इतरांमध्ये निर्माण करण्यात अपयशी ठराल
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात कौशल्यपूर्ण काम केलेत तर कामाची वाटणी उत्तम होईल
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज भरपूर कष्टाची तयारी ठेवावी लागेल तुम्ही ठरवलेल्या ध्येयाचा प्रवास अतिशय आत्मविश्वासाने करावा लागेल
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आरोग्य सुधारेल, पण पथ्य पाणी व्यवस्थित सांभाळावे
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज मनामध्ये नकारात्मक विचारांना थारा देऊ नका, मार्ग निश्चित सापडेल
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज कोणत्याही गोष्टींबद्दल नाना तर्ककुतर्क संशय या गोष्टी मनात आणू नका.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज संततीशी सुसंवाद साधावा लागेल, कोणतेही नवीन निर्णय न घेतलेले बरे..
मीन रास
मीन कुंभ राशीच्या आज वैवाहिक जीवनात मानलं तर सुख हे धोरण ठेवावे लागेल, जोडीदाराबद्दल जास्त अपेक्षा न ठेवलेल्याच बऱ्या..
(टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.)