रुळावरून घसरली सीएसएमटी लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प!
रुळावरून घसरली सीएसएमटी लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प!
img
Dipali Ghadwaje
सीएसएमटी रेल्वे स्थानकाम्यान लोकलचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे सीएसएमटीकडे जाणारी हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११.३५ वाजेच्या सुमारास सीएसएमटी लोकल प्लँटफार्म क्रमांक २ वर प्रवेश करत असताना लोकलच्या एक डबा रुळावरून घसरला. डब्यात बसलेल्या प्रवाशाना जोरदार झटका बसला. 

त्यामुळे काहीकाळ प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पण चालकाने नियंत्रण मिळवत लोकल ट्रेन थांबवण्यात यश मिळवले. लोकल थांबताच प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या घेतल्या. रेल्वे रुळावरून चालत सीएसएमटी स्थानक गाठ असल्याचे चित्र दिसून आले. मात्र, या घटनेत कुठल्याही प्रवाशाला इजा झाली नाही. दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा स्थगित करण्यात आल्याची घोषणा रेल्वेने केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले.रेल्वे रुळावरून घसरलेला लोकल ट्रेनचा डबा उचलून रेल्वे रुळावर आण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न काम सुरू केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group