घरी, हॉलमध्ये नाही तर चक्क मुंबई लोकलमध्ये रंगला , थाटामाटात हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम ; व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल
घरी, हॉलमध्ये नाही तर चक्क मुंबई लोकलमध्ये रंगला , थाटामाटात हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम ; व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल
img
DB
मुंबई शहराची खास ओळख म्हणून मुंबई लोकल ट्रेनला ओळखले जाते. दर मिनिटांला अनेक प्रवासी विविध स्वप्ने आणि जबाबदाऱ्या सोबत घेऊन प्रवास करत असतात.

सणाच्या दिवशीही मुंबई लोकल ट्रेन प्रवाशांनी भरलेली असते. मग अनेकदा विविध सण लोकल ट्रेनमध्येच साजरे केले जातात, सध्या असाच एक व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनमधील व्हायरल होत आहे , ज्यात चक्क महिला वर्गाने लोकलध्ये हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम थाटामाटात साजरा केलेला आहे.

हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम प्रत्येक महिलेसाठी खास असतो. हा कार्यक्रम खास होण्यासाठी प्रत्येक महिला तिच्या परिने प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर हळदी-कुंकूवाचा कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, मात्र पहिल्यांदा चक्क मुंबई लोकल ट्रेन मध्ये साजरा केलेला हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या पंसतील आलेला आहे.

मुंबई लोकलमधील सर्व व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या पाहिला जात असून तो इन्स्टाच्या ''sayli_moonchild'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.


दोन दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालेला आहे शिवाय तासनतास व्हिडिओला हजारो संख्येने व्ह्यूज मिळत आहेत. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''हळदी कुंकू समारंभ मुंबई लोकलमध्ये''असे लिहिण्यात आलेले आहे.
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group