भाईंदर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर दोन जणांनी रेल्वेच्या खाली येऊन आत्महत्या केली. हे दोघे वसईमध्ये राहणारे पिता-पुत्र होते. वडील हरिश मेहता ६० वर्षे आणि मुलगा जय मेहता ३५ वर्षे असे मृतांची नावे आहे. नालासोपारा येथील रहिवासी असलेल्या या बाप-लेकाच्या अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानकात खळबळ उडाली.
भाईंदर स्थानकावरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारून या दोघांनी आपले जीवन संपवले. घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, वसई रेल्वे पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
बाप-लेक स्थानकाच्या फलाटावरून चालत जातात आणि समोरून येणाऱ्या लोकलखाली झोपतात. व्हिडिओमध्ये वडील आणि मुलगा रेल्वेच्या रुळावर झोपलेले स्पष्ट दिसत आहे. अचानक धावत्या लोकलसमोर आल्यामुळे लोकल चालकाने थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो असफल ठरला आणि लोकल दोघांच्या अंगावरून गेली.
या प्रकरणी वसई पोलिसात नोंद झाली असून, पुढील तपास सुरू आहे. दोघांकडे सुसाइड नोट आढळलेली नाही. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकेलेले नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलिस अधिक तपशील शोधत आहेत.