सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधान परिषदेत मंजूर; कोणती आहे ही रेल्वे स्थानक
सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधान परिषदेत मंजूर; कोणती आहे ही रेल्वे स्थानक
img
Jayshri Rajesh
मुंबईतील स्थानकांना इंग्रजांच्या काळापासून असलेली इंग्रजी नावे आता इतिहास होणार आहे. ही नावे जाऊन रेल्वे स्थानकांना मराठमोळे नाव मिळणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेत मुंबई लोकल ट्रेन मार्गावरील ७ स्टेशन्सचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.

महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव सादर केला, नावे बदलली जाणाऱ्या स्थानकांमध्ये करी रोड, सँडहर्स्ट रोड, मरीन लाइन्स, चर्नी रोड, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड, किंग्ज सर्कल आदिंचा समावेश आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेत मुंबई लोकल ट्रेन मार्गावरील ७ स्टेशन्सचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना,भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील एनसीपीच्या महायुती सरकारकडून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. राज्याचे संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या द्वारे सादर केलेला प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. मुंबई लोकल ट्रेन मार्गावरील अनेक स्टेशन्सची नावे इंग्रजी आहेत त्याचबरोबर ते वसाहतवादी वारसा दाखवतात, अशी तक्रार केली जाते.

‘या’ सात स्टेशनची नावे बदलणार

करी रोडचे नाव – लालबाग
सँडहर्स्ट रोडचे नाव – डोंगरी
मरीन लाईन्सचे नाव- मुंबादेवी
चर्नी रोडचे नाव – गिरगाव
कॉटन ग्रीनचे नाव- काळाचौक
डॉकयार्डचे नाव – माझगाव
किंग सर्कलचे नाव- तीर्थनकर पार्श्वनाथ

मुंबईमध्ये याआधीही अनेक स्टेशन्सची नावे बदलली गेली आहेत. जसे की, ऐतिहासिक स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि एलफिन्स्टन रोडचे नाव बदलून प्रभादेवी केले होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group