नाशिक : शहरातील सर्व खड्डे डांबर टाकून बुजवावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी ढोल वाजून आंदोलन केले येत्या पाच दिवसांमध्ये पूर्ण खड्डे बुजले नाही तर उग्र आंदोलन करण्याची चेतावणी मनसैनिकांनी दिली आहे.
नाशिक शहरातील चांगले रस्ते गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आले. परंतु त्यानंतर ते रस्ते पुन्हा व्यवस्थित करण्यात आले नाही. तसेच स्मार्ट सिटीने विकासकामांच्या नावाखाली खोदलेले रस्ते व कामे अर्धवट सोडल्याने गणेशोत्सवात याचा त्रास नागरिकांना होणार आहे. शहरातील जुन्या रस्त्यांवर खड्डे नसून नवीन केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदारांनी केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे हे दिसुन येते त्यामुळे संबंधित ठेकेदारांची चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.
तसेच शहरातील इतर ठिकाणच्या रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यावर यातील मोजकेच खड्डे पेव्हरब्लॉक तसेच फक्त माती टाकून खड्डे बुजवले गेल्याने ते पुन्हा जैसे थे झालेत.खड्ड्यांमध्ये पेव्हरब्लॉक टाकल्याने रस्त्यापेक्षा पेव्हरब्लॉक उंच होऊन वाहनांच्या टायरला त्याचा हादरा बसल्याने अनेक अपघात होऊन काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. आता ढोल वाजवून प्रशासनाला जागे करण्याचं काम आज आंदोलनातून मनसैनिकांनी केले आहे . परंतु येत्या ५ दिवसात शहरातील सर्व खड्डे पावसाळी डांबर टाकून बुजवावे अन्यथा मनसे यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारेल त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळेस देण्यात आला.
आंदोलनात मनोज घोडके, प्रमोद साखरे, सत्यम खंडाळे,योगेश लभडे,साहेबराव खर्जुल ,नितीन माळी,धीरज भोसले,योगेश दाभाडे, विनय पगारे , प्रसाद सानप , मिलिंद कांबळे,निखील सरपोतदार, मनोज सोनवणे, संदिप भवर,बाजीराव मते,शशि चौधरी , अमित गांगुर्डे, व अन्य पदाधिकारी व महाराष्ट्रासैनिक उपस्थित होते.