भाजप मनसे युती होणार? मनसेच्या तीन प्रमुख नेत्यांनी घेतली देवेंद्रजींची भेट!
भाजप मनसे युती होणार? मनसेच्या तीन प्रमुख नेत्यांनी घेतली देवेंद्रजींची भेट!
img
Dipali Ghadwaje
मुंबई : सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. अशात भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. मनते नेत संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीचं नेमकं कारण काय, भाजप आणि मनसे युतीचा प्रस्ताव हे या भेटी मागचं गुपित आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

दरम्यान मागील काही दिवसांत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अनेकदा एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मनसे- भाजप यांच्या युतीबाबत अनेकदा चर्चा झाली. 

सोबतच भाजपच्या नेत्यांनी देखील अनेकदा राज ठाकरेंची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. अशात आता मनसे नेते संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर आणि नितिन सरदेसाई यांनी फडणवीसांची गुप्त भेट घेतल्याने भाजप- मनसेमध्ये युती होणार का? याबाबत चर्चा होत आहे.

विशेष म्हणजे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी देखील फडणवीसांसोबत बैठक झाली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची समजली जात आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर आता मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहेत. 

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group