अमोल मिटकरी यांची गाडी फोडल्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया; ते म्हणाले जर मनसैनिकांनी ...
अमोल मिटकरी यांची गाडी फोडल्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया; ते म्हणाले जर मनसैनिकांनी ...
img
दैनिक भ्रमर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आ. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्यांच्या विरोधात मनसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडल्याचे बोलेले जात आहे. याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,  मनसेसैनिकांनी ही गाडी फोडली असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली असेल तर त्यात गैर काहीही नाही. यासाठी मनसेसैनिकांचे अभिनंदनच आहे. कारण कुणाच्या तोंडात जे येईल ते जर कुणी बरळत असेल तर त्याला उत्तर दिलेच पाहिजे.असेही मनसेनेते संदीप देशपांडे म्हणाले.

कुणा बद्दल आपण बोलतो आहे, बोलताना आदर ठेवलाच पाहजे. मात्र बोलताना तुम्ही चुकीच्या शब्दात भाष्य करत असाल तर त्याचे परिणाम भोगावेच लागेल, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी दिला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group