भाजपाचे 'संकटमोचक' आघाडीवर ; गिरीश महाजन सातव्यांदा विजयाकडे वाटचाल
भाजपाचे 'संकटमोचक' आघाडीवर ; गिरीश महाजन सातव्यांदा विजयाकडे वाटचाल
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही राज्यातील सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे, तर ही सत्ता आपल्याकडे खेचून घेण्याचे तेवढेच मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे.  

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन विजयी षटकारानंतर यंदा सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत.

याच दरम्यान जामनेर विधानसभेतून आठव्या फेरीनंतर गिरीश महाजन ९५११ मतांनी आघाडीवर आहेत. गिरीश महाजन यांनी ४२५९४ मतं आणि दिलीप खोडपे यांना ३३०८३ मतं मिळाली आहेत. 

महाजन यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे यांच्याशी आहे. ते पूर्वाश्रमीचे भाजपचे असल्याने महाजन यांच्या स्वकियांशी होत असलेल्या लढतीकडे लक्ष लागले आहे.
  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group