विभागीय महसूल आयुक्तालयात ना.महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण
विभागीय महसूल आयुक्तालयात ना.महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण
img
Dipali Ghadwaje

नाशिकरोड (प्रतिनिधी) :- भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस अधिकारी बी. जी. शेखर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, आ. सीमा हिरे, भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, सुनील आडके, गिरीश पालवे, गणेश गिते, शांताराम घंटे, श्याम गोहाड, सिद्धेश सानप आदींसह पोलीस अधिकारी व महसूल अधिकारी उपस्थित होते.

यावेळी ना. महाजन यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस अधिकारी, तसेच शासनाचे पुरस्कारप्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थाचे सरपंच, अधिकारी, कर्मचारी, तसेच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group