टीम इंडियाचं सेमीफायनलचं ठिकाण बदलणार!  हे आहे कारण ?
टीम इंडियाचं सेमीफायनलचं ठिकाण बदलणार! हे आहे कारण ?
img
Dipali Ghadwaje
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाचा दरारा कायम आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.  भारतीय संघाने श्रीलंकेला धुळ चारत वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा सामना गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या संघासोबत होईल.

यासह भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघ सेमी फायनलचा पहिला सामना खेळणार हे जवळजवळ निश्चित आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र पाकिस्तानने वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यास सामन्याच्या ठिकाणात बदल केला जाऊ शकतो.

भारतीय संघ अव्वल स्थानी राहिल्यास भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या संघासोबत रंगणार आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

तर सेमीफायनलचा दुसरा सामना १६ नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. सेमी फायनलचा पहिला सामना खेळण्यासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या ३ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.  

जर पाकिस्तानने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर मुंबईत होणारा सामना हा कोलकात्यात खेळवला जाईल. यामागचं प्रमुख कारण असं की, २००८ मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा हात असल्याचं समोर आलं होतं. या हल्ल्यानंतर भारत -पाकिस्तान द्विपक्षीय मालिकांवर बंदी घालण्यात आली होती.

तसेच पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यावरही बंदी आणली गेली होती. हे पाहता बीसीसीआय आणि आयसीसीने पाकिस्तानचा सेमीफायनलचा सामना कोलकात्यात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group