ढोल ताशांच्या गजरात तृतीयपंथ्यांचे स्वागत; आ. कांदे यांच्याकडून तृतीयपंथीयांचा सन्मान
ढोल ताशांच्या गजरात तृतीयपंथ्यांचे स्वागत; आ. कांदे यांच्याकडून तृतीयपंथीयांचा सन्मान
img
दैनिक भ्रमर
मनमाड (नैवेद्या बिदरी) :- तृतीयपंथी अर्थात ज्यांना समाज हिजडा, किन्नर वा छक्का म्हणून ओळखतो, त्यांच्याबद्दल नेहमीच समाजातील इतर स्तरांच्या मनात एक नावडती भावना राहिलेली आहे. आज समाजात स्त्री-पुरुषांना महत्त्व मिळत असताना मात्र या तृतीयपंथी समाजाला समाजात महत्त्व मिळत नाही. 

हा समाज समाज आणि शासनाकडून दुर्लक्षित आहे.तृतीयपंथी वर्गाला जाणून वाळीत टाकल्यासारखे लोक वागवतात मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे व त्यांची पत्नी अंजुम कांदे यांनी सर्व तृतीयपंथीयांचा यथोचित सत्कार करून दिवाळीनिमित्त भेटवस्तू देखील तृतीयपंत्यांना दिल्याने तृतीयपंथी देखील भारावून गेले.

दीपावली पर्वाचा प्रारंभ सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अंजूमताई कांदे यांच्या संकल्पनेतून आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी नांदगाव आणि मनमाड शहरासह जिल्ह्यातील तृतीयपंथी यांना पाचारण करण्यात आले होते. हनुमाननगर येथील आमदार सुहास कांदे यांच्या निवास्थानापर्यंत आलेल्या सर्व तृतीयपंथी यांचे ढोलताशाच्या गजरात गुलाबाची फुले उधळीत या विशेष अतिथीचे स्वागतही जोरदार स्वागत करण्यात आले.

पुरोहितांच्या मंत्रोउच्चारात श्री व सौ कांदे यांनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर श्री पायलगिरी गुरू, महामंडलेश्वर नंदगिरी, मुस्कान गुरू, नीतू हाजी गुरू, अग्णेश गुरू, श्रावणी पायल नंदगिरी आदींचे पाद्यपूजा करीत आशीर्वाद घेतले. तत्पूर्वी आलेल्या तृतीयपंथी यांच्या हातावर मेंदी काढून हिरव्या रंगाच्या बांगड्या देत त्यांचा यथोचित साजशृंगार करीत गुलाबी रंगाचे फेटे बांधण्यात आले. महापूजेनंतर सर्वांना मिष्टान्न भोजन देत दिवाळी भेट म्हणून पैठणी आणि गिफ्ट बॉक्स तसेच ओवाळणी भेट दिली.

समाजातील दुर्लक्षित घटकांची खणा-नारळाची ओटी भरून तृतीयपंथीयांचा हिऱ्या सारख्या भावाने सन्मानाच्या कोंदणात बसवून उपकृत केले. तृतीयपंथीच्या नशिबी केवळ टिंगलटवाळी येत असते. मात्र, वंचित घटकातील किन्नरही माणसं आहेत. हे अंजूम कांदे यांनी हेरून तृतीयपंथनचा सन्मानित करण्यात जो पुढाकार घेऊन दिवाळीचा सण गोड केल्याने तृतीयपंथी देखील भारावून गेले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group