मनमाड नैवेद्या बिदरी : संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरी गावाजवळ असलेल्या हॉटेल तेजस नजिक कार व बस यांच्यात झालेल्या भिषण अपघातात तीन जागीच ठार झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये तीन वर्षाचा लहान चिमुरड्याला देखील गंभीर दुखापत झाले असून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे.या अपघाताचे बातमी समजतात आमदार सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.
याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक येथून निकिता मनोज शिंदे(२२),शुभम संतोष ललवाडे(२०), वंदना संतोष ललवाडे (४०) वेदांत मनोज शिंदे(३) हे कार क्र. एमएच १५ -सी. डी.२०५७ या गाडीतून भडगांव येथील विश्वानाथ फकिरा पाटील यांच्याकडे घरभरणी करिता जात असतांना नांदगाव शहरालगत असलेल्या गंगाधरी शिवारातील हॉटेल तेजस जवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या चाळीसगाव -मनमाड बस क्र. एम एच. १४- बी.टी. ४४९८ ओव्हरटेक करीत असतांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचुर झाला.
या अपघातात निकिता मनोज शिंदे,(२२) शुभम संतोष ललवाडे(२०), वंदना संतोष ललवाडे (४०) हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक सुनील बढे तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली. दरम्यान या भीषण अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.