मुंबई मध्ये बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आता सलमान खानयाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. .बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. दरम्यान , याच गँगच्या शूटरने अभिनेता सलमान खानच्या घरावरही गोळीबार केला होता. अशातच सलमानच्या पनवेलमधील फॉर्म हाऊसची रेकी करणारा मुख्य आरोपी सुख्खा कालूया सापडला आहे.
बाबा सिद्दिकी यांना सलमान खानच्या मैत्रीमुळे मारले गेले की चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर जाऊन बिश्नोई गॅंग मधल्या काही शूटरने त्याच्यावर हल्ला करण्यासाठी रेकी केल्याने पाच जणांना ताब्यात घेण्यात आले होतं. या शूटरचं मार्गदर्शन करणारा मुख्य आरोपी सुक्खा कालूया याला पनवेल नवी मुंबई पोलीस आणि हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. आज त्याला पनवेलमध्ये आणलं जाऊन उद्या त्याची कोर्टात हजर केलं जाणार आहे.
या दोन्ही प्रकरणाकडे पाहता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली असून सलमान खानची दुसरे घर मानले जाणारे पनवेलमधील अर्पिता फार्म हाऊसवर ही नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव अधिकचे सीसीटीव्ही आणि बॅरिकेट्स लावून याठिकाणी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला प्रवेश नाकारला आहे.