एफडीएचा पंचवटीतील तेल ट्रेडिंग दुकानावर छापा
एफडीएचा पंचवटीतील तेल ट्रेडिंग दुकानावर छापा
img
Dipali Ghadwaje
नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- अन्न व औषध प्रशासन विभागाने सलग दुसर्‍या दिवशीदेखील छापेमारी सुरूच ठेवली असून पंचवटीतील एका तेल ट्रेडिंग कंपनीवर छापा मारून भेसळयुक्त तेल जप्त केले आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

पंचवटीतील मे. श्री. आदिनाथ ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकून या दुकानामध्ये असलेल्या तेलाची तपासणी केली असता जुन्या डब्यात 64 हजार 747 रुपये किमतीच्या 388 किलो रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अन्न व सुरक्षा अधिकारी गोपाळ कासार, अमित रासकर, डी. डी. तांबोळी व सहाय्यक आयुक्त म. ना. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे व काही समस्या असल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
FDA |
इतर बातम्या
Join Whatsapp Group