FDA Raid : टाकळी रोडला गोडाऊनवर छापा, 13 लाखांचा गुटखा जप्त
FDA Raid : टाकळी रोडला गोडाऊनवर छापा, 13 लाखांचा गुटखा जप्त
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- टाकळी रोड येथील एका गोडाऊनवर छापा टाकून अन्न व सुरक्षा पथकाने सुमारे 13 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा हस्तगत केला आहे.

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन (रा. उद्योग भवन, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की संशयित शकील मतीउल्ला अन्सारी (रा. पंचशीलनगर, गंजमाळ) याने काठे गल्ली येथील टाकळी रोडवर असलेल्या गोडाऊनमध्ये आरोग्यास घातक व अपायकारक असलेला प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा केल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या पथकाने गोडाऊनवर छापा टाकला असता तेथे संशयित शकील अन्सारी हा 13 लाख 420 रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखूचा वेगवेगळ्या कंपनीचा माल विनापरवाना साठवणूक व विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कबजात बाळगताना मिळून आला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात शकील अन्सारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group