मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक खालावली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. अशक्तपणा जाणवत असल्याने जरांगे यांच्यावर सलाईनद्वारे उपचार करण्यात येत आहेत. जरांगे पाटील यांना काल रात्रीपासून ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास सुरू झाला आहे.
दरम्यान, आज जरांगे यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांच्यावर अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या निवासस्थानी उपचार करण्यात येत आहेत. अंतरवाली सराटी गावात केलेल्या सततच्या आमरण उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खराब झाली आहे. त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान , मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण मंजूर केलं, मात्र मनोज जरांगे पाटील अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय देखील घेतला. मात्र त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली.