राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलनसाठी आंतरवाली सराटी येथे आठवडाभरापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोत, असं जरांगे म्हणाले.
आपण आपल्या मागण्यांवर ठाम आहोत. तसंच, सर्व मराठा समाजाला विनंती आहे की आपण एक रहा. कोणत्याही विषयावर वाद घालू नका. आपल्याला एकत्र राहण्याची सध्या गरज आहे. मराठा समाजात मोठा वर्ग शेती करतो. त्यामुळे आपला मुलगा एखाद्या परिक्षेत काही मार्कांनी हुकला तरी त्याला मोठ दु:ख होतं. त्यामुळे आपल्या लेकरासाठी कष्ट करणाऱ्या आई-बापांना मोठा पश्चाताप अशावेळी होतो असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या आता सोडवाव्यात असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या उपोषणाला आता नऊ दिवस होत आले असून मनोज जरांगेंनी आता उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला असून , नारायणगडचे महंत शिवाजी महाराज आणि आंदोलकांच्या मदतीनं ते उपोषण सोडणार असून 'सलाईन घेऊन या मी उपोषण करू शकत नाही', असं जरांगे म्हणाले असले तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं सांगत आरक्षण दिलं नाही तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेणार असं ते म्हणाले. आचारसंहिता लागेपर्यंत राजकीय भाषा करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
फडणवीस यांना आमची विनंती आहे की आमचा वर्ग आपल्या निर्णयाची वाट पाहतोय. आम्हाला राजकारणात जायचं नाही. आमच्या समाजालाही जायचं नाही. त्यामुळे आपल्याला जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचा आपण फायदा घ्या. उगीच आपलं नुकसान करु नका. मात्र, तुम्ही जर फक्त गणित लावत बसले तर ते तितकं सोप नाही असा इशाराचं एका प्रकारे जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे. मराठा समाज हा मोठा सहनशील समाज आहे. आपण त्याचा अंत पाहू नये असंही जरांगे यावेळी म्हणाले आहेत.