सरसकट कुणबी दाखले द्या! नाहीतर....; मनोज जरांगे पाटाल यांनी सरकारला दिला
सरसकट कुणबी दाखले द्या! नाहीतर....; मनोज जरांगे पाटाल यांनी सरकारला दिला "हा" गंभीर इशारा
img
Dipali Ghadwaje


जालना (भ्रमर वृत्तसेवा) :-
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु आहे. मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.

उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी आज तपासणी केली. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आणखी तीव्र केले आहे. आजपासून पाणीही घेणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

आम्ही सरकारचे ऐकतो आहे, प्रतिसाद देतोय आहे, डॉक्टरांचेही ऐकतोय आहे. सरकारने आज निर्णय घेतला नाही तर पाणीही घेणार नाही. मी आता तसे बोलण्याच्या मूडमध्ये नाही. सरकार शंभर टक्के प्रयत्न करते आहे, बैठका घेत आहे. मी आणि माझा समाज सरकारला, डॉक्टरांना प्रतिसाद देणार आहे. शंभर टक्के निकाल लागेल. आज आम्हाला न्याय मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याच्या संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक होणार आहे. या संदर्भात अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अकरा जणांची समिती गठीत करण्यात आली होती.

मराठा समाजाच्या महसुली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळात संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्तऐवज व इतर कागदपत्रे, मराठा समाजातील लोकांची वंशावळ यावर समितीने अभ्यास केला आहे. जालन्यात झालेल्या घटनेमुळे मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे सरकार तत्काळ हा निर्णय घेत असल्याची चर्चा आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group