मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल
img
Dipali Ghadwaje
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. परंतु आज अचानक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत. अशक्तपणा जाणवत असल्याने जरांगे पाटील रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. 

दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी, मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. मनोज जरंगे-पाटील यांनी मंगळवारी आपण त्यासाठी पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचे जाहीर केलं आहे. 4 जूनपासून जालन्यात आमरण उपोषणाला बसणार असून, 8 मे रोजी शेजारील बीड जिल्ह्यातही मोठा मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group