मराठा आंदोलकांचा संयम सुटला :
मराठा आंदोलकांचा संयम सुटला : "या" ठिकाणी थेट तहसीलदाराची खुर्चीच पेटवली , नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांचा संयम आता सुटत चालला असल्याचे चित्र आहे.

राज्यात आरक्षणाची लढाई अटी-तटीवर आली आहे. मराठा आंदोलक ओबीसी आरक्षणासाठी, धनगर आरक्षणासाठी आणि ओबीसी आरक्षणाला धक्का नको म्हणून असे तीन ध्रुव झाले आहेत. राज्यातील अंतरवाली सराटी, वडीगोद्री आणि पंढरपूर हे नकाशावर आले आहे. राज्य सरकारपुढे विधानसभेपूर्वीच मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यातूनच आता कोणताही तोडगा दिसत नसल्याने आणि काही मंडळी मुद्दामहून पेच वाढवत असल्याची भावना मराठा कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते आहे. त्यातूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आंदोलकांनी उग्र आंदोलन केले आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. मराठा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात येऊन हा परिसर घोषणांनी दणाणून सोडला. त्यानंतर तहसीलदाराच्या दालनातून त्यांची खुर्ची बाहेर आणली. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात खुर्चीवर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली. मनोज जरंगे यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी खुर्ची पेटवण्यात आली. खुर्ची पेटवून फुलंब्री तालुक्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या एक दिवस अगोदर पुन्हा 16 सप्टेंबरपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या आंदोलनाला एक वर्ष उलटून गेले आहे. सरकारने जी आश्वासनं दिली होती. त्यातील काहींची अंमलबाजवणी झाली नाही. तर मुंबईच्या वेशीवर सरकारने सगेसोयऱ्याचा अध्यादेश आणि ओबीसीमधून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देऊनही त्याची सहा महिन्यात काही अंमलबजावणी झाली नाही. त्यानाराजीने जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. महायुतीला मराठा समाजाच्या नाराजीचा फटका लोकसभेला सहन करावा लागला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group