मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
img
दैनिक भ्रमर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.

महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीचा सुपडा साफ करणार, असा इशारा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. यानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा देखील झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मनोज जरांगे यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला संताप व्यक्त केला. आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान हे मराठ्यांचे आहे. आता रणशिंग फुंकले आहे. लढाईला उतरायचं म्हणजे तलवार काढावी लागेल. सरकारने मराठा आरक्षणाबाबत सरकारने आमची आशा संपवली असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची आठ दिवसात दुसऱ्यांदा भेट घेतली. मध्यरात्री पावणे दोन वाजता विखे पाटील यांनीजरांगेंची भेट घेतली. महायुतीकडून मनोज जरांगेंचा मनधरणीचा प्रयत्न सुरु आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  
निवडणूक जाहीर होताच जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, मराठ्यांना बेदखल करण्याचे काम फडणवीसांनी केले.

मराठ्यांचे आयुष्य बेचिराख करण्याचे काम फडणवीसांनी केले. फडणवीसांनी सत्तेचा वापर मराठ्यांच्या विरोधात केला. मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही यासाठीच फडणवीसांनी सुरुवातीपासून खेळी केली. देवेंद्र फडणवीस द्वेषाने वागले. मराठ्यांच्या शेपटावर त्यांनी पाय ठेवला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group