मुंबई : आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आजपासून मराठा समाजाकडून जिल्ह्या जिल्ह्यात रास्तारोको केला जाणार आहे. या जिल्हानिहाय मराठा आंदोलनाच्या पार्श्भूमीवर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणसाठी आज होणाऱ्या रस्ता रोको आंदोलना दरम्यान जिल्ह्यातील अनेक मराठा कार्यकर्त्यांना CRPC १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकावर गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश गृह विभागाकडून देण्यात आले असल्याची माहिती पोलिस दलातील अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे आदेश पोलिसांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांची माहिती पोलिसांनाकडून गोळा केली जात असल्याचे समोर आले आहे. जालना तालुक्यातील नंदापुर गावातील मराठा आंदोलक विनोद उबाळे पाटील यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, या नोटीसीनुसार प्रत्यक्ष आंदोलन केल्यास किंवा इतर कोणाकडून आंदोलन करून घेतल्यास कारवाई केली जाईल. तसेच सदर नोटीस ही पुरावा म्हणून वापरली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.