मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक
img
दैनिक भ्रमर
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जालण्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. ते सहाव्यांदा उपोषणाला बसले असून  उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.  . त्यामुळे जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या २१ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा बांधवांनी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आंतरवाली सराटी येथे दाखल व्हावे असे आवाहन देखील मराठा समाजाकडून करण्यात आले आहे

 दरम्यान , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ केली जावी. हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करावे. अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावे. यासह इतर मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला बीडमधून पाठिंबा दिला जाणार आहे. दरम्यान उद्याचा बीड बंद शांततेत असणार असल्याचं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group