सध्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हे नाव खूपच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनमुळे जरांगे पाटील यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.
आता लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा मुद्दा उचलून धरून गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करणारे मराठा समजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायाला मिळणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट येणार आहे. या चित्रपटातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी केलेला संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध 'संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटातून घेतला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी डी गोवर्धन दोलताडे यांनी हा चित्रपट तयार करण्याची घोषणा केली होती.
नुकताच या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना मराठा समजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास येत्या २६ एप्रिल पासून 'संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटातून पाहता येणार आहे.