'निवडणुकीत यांचा टांगा पलटी करायचाय'' नाशिकच्या शांतता यात्रेत मनोज जरांगेंचा इशारा
'निवडणुकीत यांचा टांगा पलटी करायचाय'' नाशिकच्या शांतता यात्रेत मनोज जरांगेंचा इशारा
img
दैनिक भ्रमर
आज मनोज जरांगे यांच्या शांतता यात्रेचा नाशिकमध्ये समारोप झाला. यावेळी  मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान , ‘परत एकदा मुंबईला चक्कर हाणावी वाटतं. समाज म्हणतोय एकतर निवडणूक लढवा. नाहीतर मुंबईला मोर्चा घेऊन चला, तुम्ही येणार असाल तर जावू मुंबईला, मराठे एकतर एकत्र येत नाहीत आणि एकत्र आले तर इतिहास घडतो. आपला विषय आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण. कोणी जरी आडवा आला तरी कुणी थांबवू शकत नाही. 29 तारखेला पाडायचे का निवडून आणायचे ठरवणार’ असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला अंतरवलीला येण्याचं निमंत्रण दिलंय

‘‘मराठा ओबीसी आरक्षणात आहे. काही झालं तरी आरक्षण मिळवून द्यायचंय. सगळ्या पक्षातील मराठ्यांनी जागे व्हा. पक्षाला बाप माणण्यापेक्षा जातीला माणा आणि निवडणूक आल्यावर भावनिक होवू नका. आरक्षण नसल्याने आपले लोक आणि विद्यार्थी मोठे होत नाही. हे बोंबलू नका. 45 वर्षापासून यांनी फसवलंय. आता निवडणुकीत यांचा टांगा पलटी करायचाय सरकारला किंवा भाजपच्या लोकांना आपल्याला आरक्षण द्यायचं नाही. आता बैठकीचा नवीन डाव टाकलाय. आघाडी आणि युती काय बैठक घेत नाही, असा आरोपही मनोज जरांगेंनी केला.

दरम्यान , ‘देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण देण्याऐवजी षडयंत्र सुरू केलं. मी काहीच चूक केली नाही. मी केवळ समाजाला आरक्षण मागितलं. आज समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि तुम्ही मराठा समाज संपवायला निघाला. तुम्हाला मराठा समाज पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. आमची चूक नसताना आमच्यावर गोळ्या झाडल्या. आम्ही असं काय केलं होतं. आरक्षण मागणं ही आमची चुक होती का? फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो नादाला लागू नका, तुमचे भाजपचे उमेदवार मुळासकट उपटून फेकू. मला राजकारणाशी देणं घेणं नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे आहे. आम्हाला घेणारं नाही तर देणारं बनावं लागेल. तुम्ही मराठा मराठ्यात भांडण लावून दिलंय, अशी टीकाही जरांगेंनी फडणवीसांवर केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group