बीपी कमी झाला, किडनीवरही परिणाम; मनोज जरांगेंचे मेडिकल बुलेटिन जारी
बीपी कमी झाला, किडनीवरही परिणाम; मनोज जरांगेंचे मेडिकल बुलेटिन जारी
img
Dipali Ghadwaje
जालना:  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. त्यामुळे उपोषणाचा परिणाम आता त्यांच्या प्रकृतीवर पण होताना पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी आरोग्य विभागचं एक पथक उपोषणास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान मनोज जरांगे यांची बीपी कमी झाली असून, त्यांच्या किडनीवर परिणाम होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहेत.

यावेळी बोलतांना डॉक्टर म्हणाले की, मनोज जरांगे यांचे रक्त चाचणी झाली आहे. तर ते पाणी पित नसल्याने युरिन आऊटपूट कमी होत आहे. रक्तात बिली रुबिन प्रमाण वाढत आहे. त्याचे परिणाम किडनीवर होत आहे. त्यामुळे अँटीबायोटिक सुरू केले आहे. सध्या एक सलाईन लावण्यात आले असून, त्यांची प्रकृती पाहता पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहे. दरम्यान काल पासून त्यांची प्रकृती बदल होत असल्याने त्यांना डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहे. मनात जरांगे यांना काल सलाईन लावण्यात आली होती. तर आज देखील डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. मात्र आज त्यांचा बीपी काही प्रमाणात कमी झाला आहे. तसेच त्यांच्या किडनीवरही परिणाम होत असल्याचं डॉक्टर म्हणाले आहे

मराठवाड्यातील मराठ्यांनी निजामकालीन शैक्षणिक आणि महसुली नोंदी दिल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातील अशी मोठी घोषणा मुख्यमँत्री शिंदेंनी केली. कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आल्याचाही सरकारनं निर्णय घेतलाय़...

दरम्यान मंत्रिमंडळात झालेल्या दोन्ही निर्णयांचा जीआर तातडीनं काढला जाईल, अशी ग्वाही अर्जुन खोतकर यांनी दिली. एकीकडे मुख्य़मंत्र्यांनी निर्णयाची घोषणा केली तर दुसरीकडे राजेश टोपे आणि अर्जुन खोतकर हे मनोज जरांगेंना निर्णयाची माहिती देण्यासाठी पोहोचले होते. जरांगेंनी दोन पावलं पुढे टाकत आता आंदोलन संपवावं अशी मागणी यावेळी खोतकरांनी केली  दरम्यान आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे आपला निर्णय देणार आहे. काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group