आज 10 डिसेंबरचा दिवस. आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी गणपतीची पूजा, आराधना केली जाते. तसेच, आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी आजचास दिवस चांगला असेल. आज तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. तसेच, मिळालेल्या उत्पन्नातून तुम्हाला आनंद मिळेल. आज तुमच्या आवडी-निवडीसाठी मोजून पैसे खर्च करा. कारण विनाकारण पैसा खर्च केल्याने तुम्हाला धनहानी होऊ शकते. आज कुटुंबातील एका व्यक्तीच्या आजारपणाशी संबंधित तुम्हाला चिंता सतावेल. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुम्ही मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. जर तुम्ही व्यवसायिक असाल तर तुम्हाला व्यवसायात नवीन प्रयोग करु शकतात. यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो किंवा नुकसान होईल. पण जे काही असेल त्याला जबाबदार तुम्ही असाल. तुमच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती चांगली असल्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संकटाचा असणार आहे. आज एकामागोमाग एक संकटं तुमच्यासमोर उभी असतील. अशा वेळी तुम्ही खचून जाऊ नका. दिवसाच्या तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तसेच, तुम्हाला तुमच्या भूतकाळातील चुकीतून काहीतरी बोध घ्यावा लागेल. आरोग्य एकदम ठणठणीत असेल.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांवर तसेच, तुमच्या जबाबादाऱ्यांवर पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. यामुळे तुमची प्रतिमा चांगली राहील. तसेच, वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला थोडा कफचा त्रास जाणवेल.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी स्वरुपाचा असणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या माध्यमातून आज सहलीचा आनंद घेता येईल. तसेच,कामाच्या ठिकाणी देखील तुमच्यावर कामाचा वाढता ताण असेल. नवीन प्रोजेक्टवर काम सुरु कराल. व्यवसायिकांना चांगली ऑफर मिळू शकते. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आजचा वेळ तुम्ही तुमच्यासाठी काढाल. तुम्हाला आवडणारे छंद जोपासाल. तसेच, तुमच्यातील कलाकार आज जागा होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळच्या वेळी धार्मिक स्थळाला भेट द्या. घरी आल्यावर आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होतील.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. तसेच, तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. तसेच, घरात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल. घरच्यांच्या तुमच्याकडून फार अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साहस आणि समृद्धीने भरलेला असणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगलं वातावर लाभेल. बॉसकडून तुमच्या कामाचं तसेच, तुमचं कौतुक केलं जाईल. आज कोणासाठीही तुम्ही मदतीचा हात पुढे करु शकता. यामुळे तुम्हालाच पुण्य लाभेल. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास झालेला पाहायला मिळेल.
धनु रास
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणारआहे. आज तुम्हाला छोट्या-मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुम्ही ठरवलेली कामेही वेळेवर पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला चिंता सतावेल. आज तुम्ही तुमच्या मित्राला बऱ्याच कालावधीनंतर भेटाल. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त कराल. तुमचं मन हलकं होईल. संध्याकाळच्या वेळी गणपतीचा मंत्र जप करा.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी सध्याचा काळ सामान्य आहे. मात्र, हळुहळू तुमचे चांगले दिवस येतील. तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडू लागतील. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्ही ठरवलेली सर्व कामे साध्य होतील. नोकरदार वर्गातील लोकांना या काळात प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबियांसाठी आज तुम्ही एखादी महत्त्वाची गोष्ट कराल.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. विद्यार्थ्यांचं आज आपल्या अभ्यासात लक्ष न लागता आजूबाजूच्या गोष्टींवर जास्त लक्ष असेल. आज तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकून टाकण्याचा तुम्ही विचार कराल. किंवा नवीन प्रॉपर्टी घेण्याच्या तयारीत असाल. संध्याकाळच्या वेळी तुमच्या घरात पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं. त्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण असेल.
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक गोष्टींचा ताण जाणवेल. तसेच, तुमची झोपही पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो. आज तुम्हाला तुमच्या भावनांशी तडजोडही करावी लागू शकते. अशा वेळी संयमाने काम घ्या. धैर्य सोडू नका. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचे आरोग्य सामान्य असेल.
(टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.)