भारताचा ‘गोल्डन बाॅय’ अडकला लग्नबंधनात , फोटो व्हायरल ; पत्नी नेमकी कोण?
भारताचा ‘गोल्डन बाॅय’ अडकला लग्नबंधनात , फोटो व्हायरल ; पत्नी नेमकी कोण?
img
Dipali Ghadwaje
जागतिक पातळीवरील ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वेळा पदकं पटकावणारा  भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने लग्न केलं आहे. समाजमाध्यमावर लग्नाचे फोटो अपलोड करून त्याने याबाबतची माहिती त्याच्या समस्त चाहत्यांना दिली आहे. 

नीरज चोप्राने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? 

नीरज चोप्राने लग्न केल्याची माहिती त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा होती. त्याच्या पत्नीचे नाव हिमानी असे आहे. नीरज चोप्राने एक्सवर पोस्ट करून  माहिती दिली.

ही पोस्ट करताना त्याने मी माझ्या  जीवनाचा नवा अध्याय माझ्या कुटुंबासोबत सुरू करत आहे. तसंच त्याने लाल रंगाचा हार्ट इमोजी टाकून नीरज आणि हिमानी असे नाव टाकले आहे. नीरजने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची पत्नी हिमानी दिसत आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोमध्ये त्याची आई त्यांना आशीर्वाद देताना दिसतेय. त्याने शेअर केलेल्या तिसऱ्या फोटोत तो लग्नविधी पार पाडताना दिसतोय.  


नीरजची पत्नी हिमानी नेमकी कोण? 

नीरज चोप्राच्या पत्नीचे नाव हिमानी असे आहे. ती सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे. खूप जवळचे मित्रमंडळी तसेच जवळच्या नातेवाईकांत नीरज आणि हिमानी यांच्या विवाह पार पडला. नीरज चोप्राने जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न केलं असलं तरी तो रिसेप्शन पार्टी देणार आहे. तशी माहिती त्याच्या काकांनी दिली आहे. 

नीरज चोप्राचे ऑलिम्पिक करिअर 
  नीरज चोप्रा हा भारताच्या सर्वोत्कृष्ट भालाफेकपटूंपैकी एक आहे. त्याने 2020 सालच्या टोक्यो येथील ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर 2024 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने रौप्य पदक पटकावले होते.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group