"हे" प्रांत अधिकारी निलंबित, तर 8 उपनिबंधकांच्या चौकशीचे आदेश
img
चंद्रशेखर गोसावी

मालेगाव - तालुक्यातील संगमेश्वर परिसरामध्ये हरित जमिनी वर बांधकाम करण्यासाठी परवानगी देणारे उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे तर सहकार विभागाच्या आठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव तालुक्यातील संगमेश्वर परिसरामध्ये असलेल्या हरित जमिनी वर सन 13-19 या कालावधीमध्ये हरित जमिनीवर बांधकाम करण्याची परवानगी नसताना देखील या परिसरात राहणारे स्टॅम्प वेडर जाकीर आणि अब्दुल्लाह यांच्या मदतीने त्यावेळचे उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांनी या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी परवानगी दिली. तसेच या परिसरामध्ये खरेदी करण्यासाठी आठ उपनिबंधकांनी परवानगी दिल्याने त्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे.

अधिवेशन संपण्याच्या आधी याबाबत अहवाल सभागृहात सादर केला जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच दोन्हीही स्टॅम्प व्हेन्डरचे परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group