सिटी लिंकच्या धडकेत वृद्ध ठार
सिटी लिंकच्या धडकेत वृद्ध ठार
img
दैनिक भ्रमर
नाशिक :  मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या वृद्धाला सिटी लिंक बसने दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सातपूर परिसरात घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भाऊसाहेब गेणुजी भांदेकर (वय 72, रा. एम.एच.बी. कॉलनी, सातपूर) हे आज सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास राहत्या घरातून मॉर्निंग वॉकसाठी इएसआय ग्राऊंडकडे जात होते. छत्रपती शिवाजी विद्यालयासमोर ते आले असता एम.एच. 15 जीव्ही 7709 या क्रमांकाची सिटी लिंक बस भरधाव वेगात आली.


बसचालकाने भांदेकरांना मागून धडक दिल्याने या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मुसळे करीत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group