सिटीलिंक बसच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; आजोबा गंभीर जखमी
सिटीलिंक बसच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; आजोबा गंभीर जखमी
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- शाळेतून आजोबा आणि पाच वर्षाची चिमुकली घरी जात असताना मद्यधुंद सिटीलिंक बस चालकाने त्यांना चिरडले. चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर आजोबांवर बिटको रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यात सध्या हिट अँड रनच्या घटना मोठ्या प्रमाणत होत आहेत. सर्वत्र अपघाताच्या बातम्या आणि त्यावर उपाययोजना यावर मंथन होत असताना आज दुपारी नाशिकरोड पूर्व भागात असलेल्या सिटीलिंक बस डेपोत दुर्दैवी घटना घडली.

मालधक्का येथील मोलमजुरी करणाऱ्या सागर गवई हे सिन्नर फाटा येथे असलेल्या सिटीलिंक बस डेपो समोर चहा विक्री चे छोटे दुकान चालवतात. आज सकाळी सागर गवई यांची आदर्श विद्या मंदिर येथे छोट्या वर्गात शिकणारी पाच वर्षीय मुलगी सान्वी सागर गवई ही दुपारी शाळा सुटल्यानंतर आजोबा समाधान गणपत गवई (वय 70) यांच्यासोबत घरी जात होती. जाताना आजी ला भेटण्यासाठी सान्वी ने आजोबा कडे आग्रह केल्याने ते तिला बस डेपो मधून घेऊन चालले होते.

आजोबा व नात हे गप्पा मारत जात असताना MH 15BG 7719 ही बस साफसफाई व धुण्यासाठी बस चालवण्याचा अनुभव नसलेल्या मद्यप्रशान केलेल्या युवकाने घाईगडबडीत चालवली. मागेपुढे न पहिल्याने त्याने आजोबा आणि सान्वीला गाडी खाली घेतले. त्यात सान्वीचा जागीच मृत्यू झाला तर तिचे आजोबा गंभीर जखमी झाले.

त्यांच्या वर बिटको रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटने नंतर अनधिकृत चालक हा पळून गेला. घटनेची माहिती समजताच राजाभाऊ वानखेडे, कामगार नेते रामबाबा पठारे, भारत निकम आदि सह नागरिकांनी गर्दी केली होती. सान्वी च्या दुर्दैवी निधनाने सर्वांचे डोळे पाणावले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group