मुख्याध्यापकाने लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल
मुख्याध्यापकाने लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर
नाशिक : 5000 हजारांची लाच मागून तडजोडी अंती 3600 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदिप प्रभाकर महाजन (वय 45) मुख्याध्यापक श्री. संत हरिहर माध्यमिक हायस्कूल नेपाणे ता. एरंडोल, जि.जळगांव असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार संत हरिहर महाराज माध्यमिक विद्याल, निपाणे, ता. एरंडोल, जि. जळगाव या शाळेत शिपाई आहेत. आरोपी महाजन हे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे  23815 रुपयाचे मेडिकल मंजूर होण्यासाठी महाजन यांच्याकडे सादर केले होते.

सदर मेडिकल बिल स्वतःचे वैयक्तिक ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव व वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात महाजन यांनी तक्रारदार यांच्याकडे 5000 रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 21/12/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती.

या तक्रारीची पडताळणी केली असता महाजन यांनी तक्रारदार यांच्या पत्नीचे 23815 रुपयांचे मेडिकल बिल मंजूर करून आणून देण्याच्या मोबदल्यात तडजोडी अंती सदर मेडिकल बिलाच्या एकूण रकमेच्या 15% प्रमाणे 3600 रुपयांची लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. म्हणून महाजन यांच्या विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.

मुख्याध्यापक संदिप महाजन यांनी या अगोदर वर नमुद गुन्ह्यातील तक्रारदार शिपाई यांचेकडून वेतन निश्चितीच्या फरकाचे 2,53,780 रुपये फरकाचे 5 टक्के प्रमाणे 12500 रुपयांची मागणी करून तक्रारदार याचेकडून 10000 रुपये लाच रक्कम स्विकारली होती.

म्हणून मुख्याध्यापक संदिप महाजन यांचे विरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अ प्रमाणे दि. 27/06/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कासोदा पोलीस स्टेशन येथे 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group