सोन्याची गगनभरारी !  ''इतक्या'' रुपयांनी वाढलं सोनं ; आजचे दर तपासा
सोन्याची गगनभरारी ! ''इतक्या'' रुपयांनी वाढलं सोनं ; आजचे दर तपासा
img
Nandini khandare More

गेल्या अनेक  दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत अनेक कमलाईचे चढ उतार होत असून आता गेल्या दोन ते दिवसांपासून सोन्याचे भाव घसरले होते. परंतु आता पुन्हा एकदा सोन्याने उसळी घेतली असून आज सोन्याच्या भावाने गगनभरारी घेतली आहे. 

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरामध्ये आज मोठी वाढ झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७७० रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेटसोबत आज २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे.

एका वृत्तानुसार ,आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ७७० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४३,५७० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ७,७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,३५,७०० रुपये खर्च करावे लागणार आहे. 

 18k- 22k आणि 24k चे दर आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचे दागिने २२ कॅरेटमध्ये तयार केले जातात त्यामुळे आज जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागेल. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७०० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३१,६०० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ७००० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,१६,००० रुपये खर्च करावे लागतील. 

 तर, २४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५७० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०७,६७० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,७६,७०० रुपये खर्च कारवे लागतील. आज सोन्याचे दर वाढले पण चांदीचे दर स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदी २३५ रुपयांना विकली जात आहे. १ किलो चांदी २,३५,००० रुपयांना विकली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group