सतर्क व्हा ! 'असा' मेसेज तुम्हांलाही येऊ शकतो ; १० रुपये भरताच बँक खात्यातून लाखो रुपये उडाले
सतर्क व्हा ! 'असा' मेसेज तुम्हांलाही येऊ शकतो ; १० रुपये भरताच बँक खात्यातून लाखो रुपये उडाले
img
वैष्णवी सांगळे
तुमचं मागील महिन्याचं पाणीकर बिल भरलेले नाही, त्यामुळ पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन तोडण्यात येईल, असा मेसेज आला आणि महिलेच्या स्टेट बँकेच्या खात्यातून १ लाख ७ हजार रुपये लंपास झाल्याची खळबळजनक घटना अकोले येथे घडलीय. तसेच अन्य २ दोन जणांना अशाच पद्धतीने गंडवण्यात आलं आहे. 



अकोल्यात व्हाट्सअँप या समाज माध्यमावर अकोला महापालिकेच्या लोगोसह १० रुपये भरून पाणी बिल अपडेट करा, नाहीतर पाइपलाइन तोडणार' असा मेसेज आला अन सायबर गुन्हेगारांनी ३ जणांना गंडवून बँक खाती रिकामी केली आहेत. मेसेज खरा वाटावा म्हणून 'पाणीपुरवठा पाइपलाइन अधिकारी' म्हणून देवेश जोशी नावाच्या व्यक्तीचा मोबाइल नंबरही दिला होता.

अकोल्यातील खदान पोलिस स्टेशन हद्दीत नागरिकांना व्हॉट्सअ‍ॅपवर 7583891729 या क्रमांकावरून मेसेज आला. या मेसेजवर अकोला महापालिकेचा लोगो वापरलेला होता. या मेसेजमध्ये 'तुमचं मागील महिन्याचं पाणीकर बिल भरलेले नाही, त्यामुळ पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन तोडण्यात येईल, 'अशी स्पष्ट धमकी देण्यात आली. 

फसवणूक झालेल्या महिला रत्नाकला भगत यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला मेसेज वाचला. या मेसेज मध्ये 'मी तुम्हाला लगेच बिल पाठवतो, पण त्याआधी तुम्ही फक्त १० रुपये ऑनलाइन पाठवा' असे सांगितले. महिलेने ऑनलाइन १० रुपये भरताच दोन ट्रान्झेक्शन झाले. पहिले ट्रान्झेक्शन ६५ हजार ६६३ रुपये तर दुसऱ्या ट्रान्झेक्शनमध्ये ३५ हजार रुपये गायब झाले.

याशिवाय एका महिलेच्या स्टेट बँकेच्या खात्यातून १ लाख ७ हजार रुपये लंपास केले आहे. तसेच अन्य २ दोन जणांना अशाच पद्धतीने गंडवण्यात आलं आहे. या घटनेने अकोल्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group