पुण्यात सायबर चोरट्यांनी फ्रॉड करत दोन व्यक्तींचे तब्बल 41 लाख रुपये लुटल्याचे समोर आले आहे. सायबर चोरट्यांनी घोरपडे पेठेतील महिलेसह पाषाणमधील एका व्यक्तीची ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.याबाबत मुंढवा आणि बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सायबर पोलिस अधिक तपास करत फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेतील एका 37 वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यातील माहितीनुसार, शेअर बाजारात चांगला परतावा देतो असं सागंत चोरट्यांनी या महिलेचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर महिलेकडून वेळोवेळी पैसे घेत त्यांनी एकूण 23 लाख 50 हजार रुपये बॅंक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. मात्र बराच कालावधी उलटून गेल्यानंतर महिलेने त्यांच्याकडे परतावा मागितला असता त्यांन तिला पैसे दिलेच नाहीत. डिसेंबर ते जानेवारी या एका महिन्याभरात हा प्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.