उकाड्यानं महाराष्ट्र हैराण! 'या' भागात IMD कडून 'येल्लो अलर्ट'
उकाड्यानं महाराष्ट्र हैराण! 'या' भागात IMD कडून 'येल्लो अलर्ट'
img
दैनिक भ्रमर
सध्या उन्हाळ्याला जोरदार सुरूवात झाली आहे. त्यातून राज्यभरात उकाडा वाढला असून IMD नंही काही शहरांना याबाबत इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि रायगडला येल्लो अलर्ट जाहीर केला आहे. येथे उष्णतेची लाट येऊ शकते यासाठी इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे हे फारच महत्त्वाचे आहे. होळी झाल्यानंतर उन्हाच्या तीव्रेत मोठी वाढ झाली आहे. त्यातून गेल्या काही दिवसांपासून मात्र ही लाट वाढते आहे. अशातच नागरिकांनाही उन्हाचा त्रास सहन करावा लागतो आहे. यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळा अनुभवला जाऊ शकतो असा इशाराही जगभरातून देण्यात येतो आहे. मंगळवारी भारतीय हवामान विभागाने येल्लो अलर्ट घोषित केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

उत्तर भारतातही उष्णतेच्या तीव्र लहरी पाहायला मिळणार आहेत. त्याचसोबत अनेक शहरांमध्ये पाण्याची कपातही पाहायला मिळते आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पाहायला मिळते आहे. याचे कारण चहूबाजूंनी होणाऱ्या पायाभूत प्रकल्पांचे बांधकाम आणि इमारतींचे कंस्ट्रक्शन. बांधकामांचा वेग जोरात असल्याने धुळीचा त्रास हा सामान्य नागरिकांना होतो आहे. IMD मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी तापमानात अचानक वाढ होण्याचे सर्वात प्रमूख कारण म्हणजे उत्तरेकडील वारे. पश्चिमेऐवजी उत्तरेकडे विलक्षण तापमान बदलते आहे, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. IMD च्या मते, येत्या दोन दिवसांत मुंबईचे कमाल तापमान हे 37 ते 38 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत तापमान हे 37-38 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते. त्यामुळे तीव्र उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

'ते' आक्षेपार्ह वक्तव्य भोवले ; सुरजेवालांवर ४८ तासांची बंदी

मुंबई, ठाणे, रायगडसह महाराष्ट्रात उन्हाळा:

रविवारी, मुंबई उपनगराचे दिवसाचे तापमान हे 33.2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. कुलाबा वेधशाळेनुसार, कमाल तापमान 32 अंश सेल्सियस होते. तर सांताक्रुझ येथे किमान तापमान हे 25.6 अंश सेल्सियस असे होते. मालेगाव येथे सर्वाधिक कमाल तापमान हे 42.6 अंश सेल्सिअस इतके होते तर जळगाव येते तापमान हे 41.5 अंश सेल्सिअस इतके होते. ठाणे परिसरात हे तापमान 41.0 अंश सेल्सिअस इतके होते. तर अहमदनगर, सातारा, नाशिकमध्ये हे तापमान 40 अंशावर पोहचले होते. रत्नागिरी येथेही तापमान जास्त असून अलिबाग येथेही उष्णतेच्या तीव्र लहरी आहेत. कल्याण-डोबिंवली येथेही उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. येथे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता अधिक असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
IMD |
इतर बातम्या
Join Whatsapp Group