विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या पद्धतीने रणनीती आखायला सुरुवात केली आहे . दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनीहि मोठी घोषणा केली आहे. आम्ही महायुतीत आहे की नाही, हेच माहीत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपापली तयारी केली पाहिजेत म्हणून आम्ही येत्या विधानसभेला महाराष्ट्रातील 288 जागा लढविणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज जाहीर केले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचा अकोला येथे वर्धापन दिन झाला. त्यात प्रदेशाध्यक्षांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येकानं आपापली तयारी केली पाहिजे. रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही. आपण किती दिवस एखाद्याच्या आश्रयाखाली राहायचं? त्यापेक्षा आपली आपली तयारी केली पाहिजे, असंही महादेव जानकर म्हणाले आहेत.