आज 'या' राशीच्या लोकांनी डोके शांत ठेवावे अन्यथा...; वाचा सर्व १२ राशींचे आजचे राशिभविष्य
आज 'या' राशीच्या लोकांनी डोके शांत ठेवावे अन्यथा...; वाचा सर्व १२ राशींचे आजचे राशिभविष्य
img
Dipali Ghadwaje
मेष - पुरातत्व खाते, जुन्या गोष्टींचा गुंडाळा घेणे या गोष्टींमध्ये आज विशेष रस प्राप्त होईल. त्यासाठी प्रवासही घडतील. मात्र डोके शांत ठेवावे. 

वृषभ - आपण केलेल्या पराक्रमाचा नव्याने विचार कराल. त्यामध्ये भर टाकून कामाच्या व्यवसायाच्या आणि गतीच्या वाटा मोकळ्या होतील. सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळाल्यामुळे दिवस चांगला जाईल. 

मिथुन - स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाची चाहूल लागेल. कष्ट आणि मेहनतीने प्रगती करण्याचा आजचा दिवस आहे. जुन्या संधी नव्याने प्राप्त होतील.

कर्क - शनि प्रदोष सारखा आज चांगला दिवस आहे. शिव उपासना करण्यामुळे मनातील इच्छा पूर्ण होतील. धनाच्या दृष्टीने उत्तम संधी प्राप्त होणार आहेत. 

सिंह - लाभात व्यत्यय येईल. स्वतःचे निर्णय स्वतः योग्य रीतीने घेऊन पुढे जावे लागेल. कदाचित अव्वाच्या सव्वा सगळ्या गोष्टी करण्याच्या मागे दिवस संदिग्ध राहील. 

कन्या- व्यापार व्यवसायात मोठे यश प्राप्त होईल. पत्रव्यवहार मार्गी लागतील. अनेक दिवस रखडलेल्या गोष्टी सहज होताना आज दिसून येतील. मनाची उभारी वाढेल.

तुळ - जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. पैशाची आवक जावक चांगली असल्यामुळे निदान तो एक वेगळा आधार वाटेल. 

वृश्चिक - आरोग्य चांगले राहील. मनासारख्या घटना घडतील. नव्याने वस्तू खरेदी कराल. सकारात्मक रहाल. 

धनू - मोठे खर्च होतील. मानसिक अस्वस्थता सांभाळावी लागेल. कामात व्यत्यय आणि त्रास आहेत. 
 
मकर - प्रेमात यश आहे. अनेक लाभ होणार आहेत.मित्र कामी येतील. प्रवास घडतील. 

कुंभ - सुरवांटाचे फुलपाखरू मध्ये रूपांतर होण्याचा आजचा दिवस आहे. स्वतःवरचा विश्वास दृढ होइल. कामे द्रुगोचर होतील आणि वेगळ्या यशाकडे आज आपण झोप घ्याल. 

मीन - शनी प्रदोष आज फलदायी ठरेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणारा दिवस आहे. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. मनस्थिती चांगली राहील.


(टीप : वरील सर्व गोष्टी दैनिक भ्रमर माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. दैनिक भ्रमर यातून कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Join Whatsapp Group