तोच तो... तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो ? सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल
तोच तो... तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो ? सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल
img
वैष्णवी सांगळे
सध्या राज्यात अशोक खरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात पोलीस कोठडीत असून त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एसआयटी कडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान अशोक खरात वरून राज्याच्या राजकारणात मोठे वादळ उठलेले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गंभीर आरोप करत आहे. 



अशातच शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी ट्विट करत थेट नाव घेत ठाकरे कुटुंबीयांना लक्ष्य केलं. त्यामुळे, ठाकरेंच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी शितल म्हात्रेंवर पलटवार केला. त्यावरुन, दोन्ही महिला नेत्यांमध्ये ट्विटरवरुन छन्नाछन्नी रंगल्याचं दिसून येत आहे. 

क्रूरकर्मा खरात ला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्री च्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे… यही तो नही “ताज” का राज ? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे… ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल … त्यासोबतच सुषमा अंधारेंच्या ट्विटला उत्तर देताना म्हात्रे म्हणाल्या  ताई, उबाठाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल??? प्रियांका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला…आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा आहे की काय तुमचा???त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे…ताई, खासदार-आमदार व्हायची स्वप्नं आता सोडून द्या…मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही… असे ट्विट केले. 

या ट्विटला मग सुषमा अंधारे यांनीही उत्तर देत पलटवार केला. अहो विषय भरकटवू नका... आपण तुमच्यावर संशोधन करायला बोलत आहोत... बाय द वे तुमचा व्हिडिओ मॉर्फ केलाय असं तुम्ही म्हणाला होतात.. तोच तो सुर्वे प्रकरणातला... त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो. ? असं अंधारे यांनी ट्विट केलंय. 

यावर पुन्हा सुषमाताई, मूळ विषय हा ताजमध्ये झालेल्या मीटिंगचा आहे. त्यामुळे उगाच इकडे तिकडे उड्या मारू नका… खरातला पाण्याची लाईन देण्यासाठी ताजमध्ये कोणी बैठक घेतली होती? त्यासाठी मध्यस्थी करणारा नेता कोण होता? पाईपलाइनचा जी.आर. काढण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमने आदेश दिला होता की नाही ? त्यामागे कुठली न्यूमरॉलॉजी होती? याची चर्चा व्हायला पाहिजे ना, ताई?? ताई, त्यावेळी तुम्ही शिवसेनेत नव्हत्या… वंदनीय बाळासाहेबांना शिव्याशाप देण्यात आणि उबाठा व आदूबाळाला दहीहंडीच्या थरावर चढवण्यात मग्न होत्या… त्यामुळे तुम्हाला कदाचित माहिती नसेल.!! त्यामुळे ज्यांच्या आदेशाने तुम्ही ही टीवटीव करत आहात, त्यांना जाऊन विचारा – ताज का राज… असे शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group