३ मे २०२४
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. सुषमा अंधारे यांना सभेसाठी घ्यायला आलेले हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाले. या घटनेमध्ये पायटल सुखरुप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महाडमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.
मिळालेल्या माहितीनुसार अपघातामध्ये हेलिकॉफ्टरचे मोठे नुकसान झाले आहे. सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसणार त्याअगोदर हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सकाळी 9.30 वाजता सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेने जाणर होत्या . बारामतीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाडहून बारामतीला निघाल्या होत्या.
बारामतीला जाण्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहचल्या. हेलिकॉप्टरचा अपघात सुषमा अंधारे यांच्या समोरच झाला आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. महत्त्वाचे म्हणजे हेलिकॉप्टरचा पायलट सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले.
नेमकं काय घडले?
हेलिकॉप्टर हे साधारण नऊच्या सुमारास आले. हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती आहे. कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते. ते खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र ज्यावेळी ते उतरण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. सुषमा अंधारे सुखरुप असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. सध्या त्या महाडमध्येच आहे. मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.
Copyright ©2024 Bhramar