अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो; सुषमा अंधारेंचं
अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो; सुषमा अंधारेंचं "या" मंत्र्यांना सडेतोड उत्तर
img
Jayshri Rajesh
पुण्यात ड्रग्ज विरोधात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी धरणे आंदोलन सुरू आहे.  पुणे शहराची ड्रग्जच्या विळख्यातून सुटका व्हावी यासाठी  उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी  त्यांनी केली आहे. शंभुराज देसाईंच्या नोटिसेवर देखील त्यांनी  शंभुराज देसाई आम्ही तुमच्या धमकीला घाबरत नाही,तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू,असे सडेतोड उत्तर सुषमा अंधारेंने दिले आहे.

पुणे विद्येचे माहेरघर म्हटलं जाते,  पण आता याच पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पुण्यात फक्त अधिकृत 23 पब बार आहेत,  ज्याच्याकडे परवाना आहे. यादी  फक्त 23  बारची वाचली, मग 100 बार पब कोणाच्या आशीर्वादने चालतात हे आम्हाला माहीत असल्याचेही सुषमा अंधारे म्हणाल्या. 

तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू : सुषमा अंधारे

पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत  सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं. राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा फोटो असलेल्या एका खोक्यावर 50 खोके असं लिहिलं होतं.  रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्यासह रवींद्र धंगेकर यांना थेट अब्रुनुकसानीची नोटीस बजावली होती. या नोटीसीवर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या,  शंभुराजे देसाई तुमच्या धमकीला घाबरत नाही, तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू. कुठल्या तोंडाने तुम्ही नोटिसा पाठवत आहात. नोटिसी पाठवता मग  कारवाई का होत नाही,राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी तुमचे लागेबांधे आहेत. 

राजपूत यांचं निलंबनाची कारवाई करा- अंधारेंची मागणी

 पुण्यातील पब, बारची माहिती आमच्याकडे आहे . तर राज्य उत्पादन शुल्क विभाग चरणसिंग राजपूत यांच्या अधिपत्याखाली कसे चालतात? याची माहिती आमच्याकडे आहे. चरणसिंग राजपूत यांचं निलंबन करून कारवाई केली पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे. 23 अधिकृत पब बार व्यतिरिक्त इतर पब बारवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group