नीट पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली आहे. आता या प्रकरणाचा तपास CBI करत असून आता या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होत आहेत. दरम्यान आता या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आगामी परीक्षेत पुन्हा पेपर लीक होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारकडून लष्करावर परीक्षेच्या पेपरची सुरक्षितता आणि गुप्तता याची जबाबदारी सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह काही महत्त्वाचे मंत्री तसेच अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक सुरू होती.
ही उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानंतर माहिती समोर आली आहे. या बैठकीत एनटीएचे महासंचालक आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. आता नीट पेपरच्या संपूर्ण प्रक्रियेवर PMO चं लक्ष असेल. इतकेच नाही तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांचे या संबंध प्रक्रियेवर बारीक लक्ष असणार आहे. आगामी परीक्षा 21 तारखेला घेतली जाणार असून केंद्र शासन अत्यंत सतर्क झाल्याचं दिसतंय.