NEET परीक्षा  निर्णयावरून देशभरात गोंधळ; विद्यार्थ्यांचे रस्त्यावर आंदोलन
NEET परीक्षा निर्णयावरून देशभरात गोंधळ; विद्यार्थ्यांचे रस्त्यावर आंदोलन
img
Nandini khandare More

   

NEET 2026 परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा धक्काच बसला आहे. या निर्णयावर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये NEET 2026 परीक्षा प्रकरणावरून विद्यार्थ्यांचा संताप मोठ्या प्रमाणात उसळला असून शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. NEET रद्द झाल्यानंतर देशभरात अस्वस्थता वाढली आहे. दिल्लीतील परिसरात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत राष्ट्रीय परीक्षा संस्थेविरोधात  घोषणाबाजी केली.

3 मे रोजी झालेल्या परीक्षेनंतर पेपर लीकचे आरोप समोर आले होते. राजस्थानसह काही राज्यांमध्ये संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवण्यात आला. त्यानंतर तपासाच्या पार्श्वभूमीवर NEET 2026 परीक्षा रद्द करणायचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अनिश्चिततेत सापडले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्याच्या निर्णयाला विरोध करत पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे . 

इतर बातम्या
Join Whatsapp Group