शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत  मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा; खात्यात कधी पैसे येणार?
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा; खात्यात कधी पैसे येणार?
img
Nandini khandare More

 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून येत्या ३० जुलैआधी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी चर्चा होता. सरकारकडून देखील कर्जमाफीसंदर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत. अशामध्ये मुख्यमंत्र्यांनी थेट कर्जमाफीबाबत महत्वाची अपडेट दिली त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधत राज्यासह देशातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत महत्वाची अपडेट दिली. त्यांनी सांगितले की, कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर केली जाणार आहे. उद्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group