राजकीय घडामोडींना वेग आला असून आता शरद पवार यांच्या गटात मोठी हालचाल होण्यास सुरवात झाली आहे. शरद पवार यांच्या पक्षात मोठ्या संघटनात्मक बदलांची घोषणा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांची पदे काढून नव्या नियुक्त्यांसंदर्भात तातडीचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे पक्षाच्या अंतर्गत राजकारणाला वेग आला असून, आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे
शरद पवार यांचा पक्ष लवरच एनडीएत सहभागी होऊ शकतो, असं बोललं जातंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. आम्ही एनडीएत सामील होणार नाही, असं अनेक नेत्यांनी सांगितलंय. परंतु दुसरीकडे पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. असं असतानाच आता शरद पवार यांच्या पक्षाने तातडीने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकारणात एकच खळबळ उडाली आहे
नेमका निर्णय काय?
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. पक्षाकडून अधिकृतपणे महेश तपासे आणि माजी आमदार विद्या चव्हाण हे दोन नेते माध्यमांसमोर आपली भूमिका मांडतील, असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ट्विट करत याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्यांच्या इतर सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.