मेष
आज मार्च महिन्याचा पहिलाच दिवस मेष राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभल्याने मन प्रसन्न होईल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांच्या आज मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभल्याने ऑफिसमध्ये आनंदाचं वातावरण राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील. घरी नव्या पाहुण्याचे आगमन होण्याची शक्यता.
कर्क
कर्क राशीच्या लोकांचे आज राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. कामानिमित्त केलेले प्रवास सुखकर होतील. पण वाहने चालवताना काळजी घ्यावी लागेल. एखादी चूक महागात पडू शकते.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी महिन्याचा पहिलाच दिवस शुभ असेल. जिद्द व चिकाटीने काम केल्यास मोठे यश मिळेल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागल्याने खिसा रिकामा होण्याची शक्यता आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी मार्च महिन्याचा पहिलाच दिवस शुभ भरभराटीचा असेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. जुनी येणी वसूल होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
तुळ
तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना आज परीक्षेत घवघवीत यश मिळेल. ज्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. मन आनंदी व आशावादी राहील. आध्यात्मिक प्रगती झाल्याने बरे वाटेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मार्चचा पहिला दिवस संकटाचा आहे. मौल्यवान वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने थोडी जपूनच चालवा.
धनु
धनु राशीच्या लोकांना महिन्याचा पहिल्याच दिवशी मोठा धनलाभ होण्याची शक्याता. आज अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक प्रश्न मिटल्याने टेन्शन कमी होईल.
मकर
मकर राशीच्या लोकांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी नोकरीची ऑफर येण्याची शक्यता आहे. लग्नाळू व्यक्तीला लग्नाचा योग जुळून येईल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्चचा पहिला दिवस अत्यंत शुभ आहे. गुरूकृपा लाभल्याने एखादी चांगली गोष्ट कानी येईल. लग्नाचे योग जुळून आल्याने कुटुंबात आनंदाचं वातारवण राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग नोंदवाल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा संकटाचा आहे. कुणासोबतही वादविवाद घालू नका. शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मौल्यवान वस्तू सांभाळा, खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.